Uncategorized

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता

मुंबई : महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले, त्यांना उपमुख्यमंत्रीपदी शपथ घ्यावी लागल्याने आधीच शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यात, आजच्या शपथविधी सोहळ्यात योग्य मान-सन्मान न झाल्यावरून शिवसेना (Shivsena) शिंदे गट नाराज झाला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, आज लगेच पहिल्या दिवशी मी तक्रार करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीयमंत्री, भाजपचे दिग्गज नेते, वरिष्ठ नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांची मोठी गर्दी होती. याशिवाय आमदार, खासदार आणि महायुतीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button